कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीने संपादन केलेल्या प्रचंड बहुमताचा विजय साजरा करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी शहरातील लोकमान्य टिळक चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी रायगडचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण तसेच महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.