• English
  • मराठी

कोपर फाटा येथे सिडकोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी उभारण्यासाठी एक एकर जमिनीचे नियोजन

उलवे नोडमध्ये नव्याने झालेल्या खारकोपर रेल्वे स्टेशन जवळ, कोपर फाटा येथे सिडकोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी उभारण्यासाठी एक एकर जमिनीचे नियोजन करण्यात आले असून याकामी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आले आहेत. या नियोजित जागेची पाहणी लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, सिडकोचे अधिक्षक अभियंता केशव वरखेडकर, गीरी रामवड, तसेच वसंत पाटील, विजय घरत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, चेतन घरत, नंदकुमार ठाकूर, व सिडको अधिकारी, यांच्या उपस्थितीत झाली.