• English
  • मराठी

उरणमधील ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड या कंपनीमधील १३१ कर्मचाऱ्यांना कपातीचे कारण सांगून कमी करण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी प्रकल्पग्रस्त असून त्यांची जमीन संपादित करताना नोकरीचे हमीपत्र देण्यात आले होते. या सर्व कामगारांना उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नाही . त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांची भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापनासोबत संयुक्त बैठकीची मागणी बुधवारी केली.हि मागणी तात्काळ मान्य करीत कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांनी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीचे मालक आणि व्यवस्थापनासोबत येत्या ८ दिवसात बैठक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.