• English
  • मराठी

‘आम्ही उद्योगिनी’ व नवी मुंबई समन्वय संस्थेच्यावतीने ‘दिवाळी जल्लोष भव्य प्रदर्शन व विक्री’ चे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन २७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान कळंबोली येथील सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र येथे सुरु होते.

‘आम्ही उद्योगिनी’ व नवी मुंबई समन्वय संस्थेच्यावतीने ‘दिवाळी जल्लोष भव्य प्रदर्शन व विक्री’ चे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन २७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान कळंबोली येथील सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र येथे सुरु होते. या प्रदर्शनामध्ये दिवाळी फराळ, घर सजावटीचे साहित्य, दिवे, पणत्या, कंदील, सुगंधी साबण, अत्तर, सौदर्य प्रसाधनं, आयुर्वेदीक औषधे, दागदागिने, रंग-रांगोळ्या, साड्या, वस्त्र प्रावरणे आदी वस्तू विक्रीस उपलब्ध होते. या प्रदर्शनाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.