• English
  • मराठी

पनवेल मधील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा’चे आयोजन करण्यात आले होते.

पनवेल मधील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा’चे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ रयतचे सहसचिव डॉक्टर विजयसिंग सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौंऊन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या समारभात शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धांमध्ये उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या समारंभास अनेक पदाधिकारी, मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.