• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मच्छीमार सेलच्या पनवेल तालुका संयोजकपदी मोरावे येथील उत्तम कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी कोळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते निलेश म्हात्रे, नामदेव गाताडे, रविंद्र शेळके आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उत्तम कोळी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. उत्तम कोळी यांना देण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास आम्हाला आहे आणि तो ते पूर्ण करून दाखवतील.

भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मच्छीमार सेलच्या पनवेल तालुका संयोजकपदी मोरावे येथील उत्तम कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
१५ फेब्रुवारी २०१८ रोजी कोळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते निलेश म्हात्रे, नामदेव गाताडे, रविंद्र शेळके आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उत्तम कोळी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. उत्तम कोळी यांना देण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास आम्हाला आहे आणि तो ते पूर्ण करून दाखवतील.