• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी , रायगड जिल्हा यांच्या विद्यमाने ” स्वातंत्र सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा ” रोहा येथील डॉ . सी . डी. देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला होते . या सोहळ्यास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू यांची प्रमुख उपस्थिती लाभली . देशाच्या ७० व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून भाजपच्या ‘ आझादी के सत्तर साल , जरा याद करो कुर्बानी ‘ या शीर्षकाखाली ९ ते २३ ऑगस्ट पर्यंत देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत . याचाच एक भाग म्ह्णून रायगड मध्ये ” स्वातंत्र सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड , रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळ माने , राजन तेली , प्रदेश प्रवक्ते गणेश हाके व आदी मान्यवर उपस्थित होते .