‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पारंपारिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ‘श्रीं’चे मोठ्या थाटात आगमन झाले. गणेशभक्तांचा अपार आनंद, पारपांरिक वाद्यांचा गजर अशा भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात गणरायांचे स्वागत करण्यात आले.