• English
  • मराठी

अमेटी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त शेतकऱयांची सातत्याने फसवणूक सुरू ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांच्या श्री सदगुरू कॄपा शेतकरी संस्थेने भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतॄत्वाखाली लढा उभारला आहे त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी आज भाताण येथील अमेटी विद्यापीठावर धडक आंदोलन करण्यात येणार होते मात्र येत्या आठ दिवसात हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरून निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याने मोर्चा न काढता फक्त अमेटी व्यवस्थापनाला समज देण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱयांना नोकरीच्या भूलथापा देऊन प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अमेटी विद्यापीठाचे पनवेल येथील व्यवस्थापन करीत आहे. येत्या आठ दिवसात व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱयांना न्याय दिला नाही तर आमच्या संयमाचा बांध फुटेल, असा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अमेटी विद्यापीठ व्यवस्थापनाला आज दिला.