जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वदिनी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने आज खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात ‘प्रबोधनात्मक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, डॉ. निशांत काठाळे, डॉ. प्राची काठाळे, डॉ. सोमेश वैद्य, डॉ. नवीन खत्री, प्रशांत भट यांनी मार्गदर्शन केले.