खारघर शहर भाजपाच्या वतीने पाठपुराव्यामुळे खारघर कोपरा येथील जोडरस्त्याच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगानं तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी या कामाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे परवानगी दिल्याने सिडको खारघरच्या वतीने जोडरस्त्याच्या बांधकामास सुरवात करण्यात आली. या रस्त्याने खारघरच्या रहिवाश्यांना थेट पनवेलकडे जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.