• English
  • मराठी

केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार शिवकर व उसर्ली खुर्द ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक व्यापारी, दुकानदार व छोटया व्यवसायिकांना रोकड विरहित यंत्राचे मोफत वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.सरकारच्या नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने डिजिटल होणे गरजेचे असून रोकड विरहित प्रणालीचा वापर त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवकर येथे आज केले. जगामध्ये भारत क्रमांक एकचा देश व्हावा, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली असून त्या अनुषंगाने काम सुरू आहे. डिजिटल पेमंटवर सरकारतर्फे लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आल्याचे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कॅशलेससाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार शिवकर व उसर्ली खुर्द ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक व्यापारी, दुकानदार व छोटया व्यवसायिकांना रोकड विरहित यंत्राचे मोफत वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.सरकारच्या नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने डिजिटल होणे गरजेचे असून रोकड विरहित प्रणालीचा वापर त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवकर येथे आज केले.
जगामध्ये भारत क्रमांक एकचा देश व्हावा, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली असून त्या अनुषंगाने काम सुरू आहे. डिजिटल पेमंटवर सरकारतर्फे लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आल्याचे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कॅशलेससाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.