• English
  • मराठी

पावसानेे घेतलेल्या रुद्रावताराने पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी साचले आहे. त्यामुळे डुंगी गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि सिडकोच्या अधिकार्‍यांसोबत मी डुंगी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री आणि आमदारांना डुंगी गावाचे पुर्नवसन लवकरात लवकर करावे असे निवेदन दिले. डुंगी गावाच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असा विश्वास ग्रामस्थांना दिला. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन डुंगी गावाचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, तसेच नागरीकांच्या दृष्टीने सोइस्कर असा मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करु.

पावसानेे घेतलेल्या रुद्रावताराने पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी साचले आहे. त्यामुळे डुंगी गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि सिडकोच्या अधिकार्‍यांसोबत मी डुंगी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री आणि आमदारांना डुंगी गावाचे पुर्नवसन लवकरात लवकर करावे असे निवेदन दिले.
डुंगी गावाच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असा विश्वास ग्रामस्थांना दिला. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन डुंगी गावाचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, तसेच नागरीकांच्या दृष्टीने सोइस्कर असा मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करु.