• English
  • मराठी

मन:पूर्वक आभार

मन:पूर्वक आभार खारघर- कामोठे येथील टोल नाक्यावर छोट्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून व्यक्तिश: मी त्यांचा सर्वसबंधीतांचा मन:पूर्वक आभारी आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रातिल मतदारांनी माझावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी सतत काम करत राहिलो. येथील मतदारांना दिलेले वचन पूर्ण केल्या बद्दल राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब व त्यांचा सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
 – ३१ मे २०१५ च्या मध्यरात्रीपासून १२ टोलनाके बंद केली जाणार

– ३१ मे २०१५ च्या मध्यरात्रीपासून ५३ टोलनाक्यांवर कार, जीप तत्सम छोटी वाहनेआणि एसटी बसेसकडून टोल आकारणी बंद होणार, यात २७ नाके हे सांबाविचे, तर २६ एमएसआरडीसीचे
– कोल्हापूर टोलनाक्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची समिती ३१ मे २०१५ पूर्वी निर्णय करेल.
– अतिरिक्त मुख्य सचिव (साबांवि) यांची समिती मुंबई एन्ट्री पॉईंट आणि मुंबई-पुणेएक्सप्रेस हायवेसंदर्भात आपला अहवाल जुलैअखेरपर्यंत सादर करेल.