• English
  • मराठी

श्री सत्य साई संजीवनी सेंटरचे भुमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर, आमदार प्रशांत ठाकूर, श्री सत्य साई संजीवनी सेंटरचे चेअरमन सी.श्रीनिवास, मधुसुदन नायडू, अरविंद त्यागराज आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, श्री सत्य साई बाबा यांनी सुरु केलेला हार्ट केअर उपक्रम हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. गरीब माणसाच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी असे उपक्रम समाजासाठी महत्वाचे असतात. माझ्या आयुष्यात प्रथमच कॅशलेस सेंटर मी पाहिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेकांना मदत करताना त्याच्या डोळयातील आनंद पाहून मला मुख्यमंत्री झाल्यापेक्षाही खूप आनंद होतो. हे सेंटर अतिशय गतीने होत आहे. गेल्या एक वर्षापूर्वी या सेंटरसाठी जागा मागण्यात आली. व आज अचानक भुमिपुजनाला निमंत्रण मिळाले. सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी मला हे सेंटर एक वर्षाच्या आत पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी मदत केली जाते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात. हीच मानव सेवा आहे असेही ते म्हणाले.