• English
  • मराठी

नैना क्षेत्रातील पनवेल तालुक्यात असलेल्या सुकापूर, विचुंबे, देवद, आदई, आकुर्ली, नेवाळी या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना आवश्यक तितके पाणी देण्यात यावे, तसेच नवीन जोडणीचेही काम पूर्ण करावे, असे आदेश बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेला दिले. नैना क्षेत्रातील ग्रामपंचायतींतर्गत असणार्‍या गावांना नेमकी किती पाण्याची गरज आहे त्याचा नवी मुंबई महापालिका, सिडको, रायगड जि. प. पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत सर्वप्रथम सर्व्हे करावा आणि त्यानुसार लवकरात लवकर पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, त्याचप्रमाणे नवीन जोडणी देण्याचेही काम पूर्ण करावे, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी संबंधितांना आदेशित केले.

नैना क्षेत्रातील पनवेल तालुक्यात असलेल्या सुकापूर, विचुंबे, देवद, आदई, आकुर्ली, नेवाळी या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना आवश्यक तितके पाणी देण्यात यावे, तसेच नवीन जोडणीचेही काम पूर्ण करावे, असे आदेश बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेला दिले. 
नैना क्षेत्रातील ग्रामपंचायतींतर्गत असणार्‍या गावांना नेमकी किती पाण्याची गरज आहे त्याचा नवी मुंबई महापालिका, सिडको, रायगड जि. प. पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत सर्वप्रथम सर्व्हे करावा आणि त्यानुसार लवकरात लवकर पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, त्याचप्रमाणे नवीन जोडणी देण्याचेही काम पूर्ण करावे, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी संबंधितांना आदेशित केले.