पनवेल महापालिका परिक्षेत्रांतर्गत असलेल्या सर्व सार्वजनिक सुलभ शौचालयांच्या साफसफाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशी ‘जेटींग मशिन’ वाहने सुरु करण्यात आली आहेत. या मशीनच्या साहाय्याने कमी पाणी आणि कमी मन्युष्य बळाने स्वच्छता गृह साफ करण्यात येणार आहेत. या वाहनांचे भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. पनवेल महापलिकेच्या माध्यमातून प्रभाग समिती ‘अ’ आणि ‘ब’ मध्ये शौचालय साफसफाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त अशी जेटींग मशीन वाहने देण्यात आली आहेत.