• English
  • मराठी

रसायनी येथील एचओसी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी वापर नसलेल्या जमिनी संंबंधित शेतकऱ्यांना परत कराव्यात अशी आग्रही मागणी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी व माझ्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मुंबई येथे करण्यात आली.

रसायनी येथील एचओसी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी वापर नसलेल्या जमिनी संंबंधित शेतकऱ्यांना परत कराव्यात अशी आग्रही मागणी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी व माझ्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मुंबई येथे करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल (एचओसी) या कंपनीच्या स्थापनेसाठी पनवेल तालुकतील रसायनी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. एचओसी कंपनीच्या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या जमिनी वगळता विनावापर पडून असलेली सुमारे ४२२ एकर जमीन ज्यावर आजही संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कब्जा व वहिवाट आहे, अन्य प्रकल्पाकरिता न वापरता शेतकऱ्यांना परत द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे केली. यावर ना. रविंद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.