• English
  • मराठी

उरण बेलापूर रेल्वेसाठी गव्हाण,जासई,शेलघर,बेलपाडा येथील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून साडेबावीस टक्के विकसित भूखंड द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत शुक्रवारी बेलापूरमधील सिडकोभवन येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी हि मागणी केली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी याबाबत १५ दिवसांचा अवधी मागितला असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. सिडको नवीमुबई विमानतळाचे काम युद्धपातळीवर करीत असतानाच बेलापूर उरण रेल्वे,प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर काम करीत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाबाबत कांही ठिकाणी जटिल समस्या आहेत. नव्या प्रकल्पांमध्ये साडेबावीस टक्के सिडको कश्यापद्धतीने देणार याबाबत सिडकोकडे प्रकल्पग्रस्त विचारणा करीत आहेत. याबाबत शुक्रवारी सिडको कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये निवाडा २/९४ न्हावे १७१ लोकांना साडेबारा टक्के भूखंड मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेलापूर उरण रेल्वेसाठी ४५० ते ५०० एकर जागा संपादित करण्याचा विषयसुद्धा चर्चेला गेला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी सोयीस्कर होईल अशी गतिमान यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

उरण बेलापूर रेल्वेसाठी गव्हाण,जासई,शेलघर,बेलपाडा येथील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून साडेबावीस टक्के विकसित भूखंड द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत शुक्रवारी बेलापूरमधील सिडकोभवन येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी हि मागणी केली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी याबाबत १५ दिवसांचा अवधी मागितला असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. 
सिडको नवीमुबई विमानतळाचे काम युद्धपातळीवर करीत असतानाच बेलापूर उरण रेल्वे,प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर काम करीत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाबाबत कांही ठिकाणी जटिल समस्या आहेत. नव्या प्रकल्पांमध्ये साडेबावीस टक्के सिडको कश्यापद्धतीने देणार याबाबत सिडकोकडे प्रकल्पग्रस्त विचारणा करीत आहेत. याबाबत शुक्रवारी सिडको कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये निवाडा २/९४ न्हावे १७१ लोकांना साडेबारा टक्के भूखंड मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेलापूर उरण रेल्वेसाठी ४५० ते ५०० एकर जागा संपादित करण्याचा विषयसुद्धा चर्चेला गेला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी सोयीस्कर होईल अशी गतिमान यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.