• English
  • मराठी

प्रभाग दहा येथे भाजप आणि नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रभाग दहा येथे भाजप आणि नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आपण सिडकोच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे ऐकूण घेऊन नागरी समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे. रहिवाशांचे प्रश्न स्थानिक नगरसेवक आणि भाजपच्या माध्यमातून सोडवले जात होते. आता जनसंपर्क कार्यालय सुरू झाल्याने शासनाच्या वेगवेगळया योजनाची माहिती या ठिकाणी मिळेल तसेच भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण केले जाईल.