• English
  • मराठी

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी) मध्ये नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी) मध्ये नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ‘आय थिंक स्पोर्ट्स क्रिकेट’ अकॅडमीच्या वतीने आरटीआयएससीमध्ये आठ वर्षांवरील मुला-मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण वर्गांतर्गत क्रिकेटपटूंना शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत धडे देण्यात येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.