• English
  • मराठी

श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खारघर मॅरेथॉन 2017’ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात उभारलेल्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी व रोकड विरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ”Run To Pramote #Cashless Transaction” या महत्वपूर्ण संकल्पनेचे घोषवाक्य घेवून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेस १२ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला . लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मॅरेथॉनला प्रसिध्द नर्तिका व सिने कलाकार सुधा चंद्रन यांच्या हस्ते व आर जे अर्चना आणि आर जे सलिल यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून प्रारंभ झाला. श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे प्रमुख संयोजक, स्पोर्टस काँम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक परेश ठाकूर यांच्या सुयोग्य नियोजनातून पार पडलेल्याया मॅरेथॉन ला उदंड प्रतिसाद लाभला व मॅरेथॉन यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेतील पुरूषांच्या खुल्या गटात बीडच्या अविनाश साबळे याने, महिलांच्या गटात वेस्टर्न रेल्वेच्या किरण सरेदार तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुरूषांच्या खुल्या गटात अलिबागच्या सुजित गमरे आणि महिलांच्या गटात उरण जिमखान्याच्या सोनिया मोकल यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावित मॅरेथॉन मध्ये बाजी मारली.

श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खारघर मॅरेथॉन 2017’ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात उभारलेल्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी व रोकड विरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ”Run To Pramote #Cashless Transaction” या महत्वपूर्ण संकल्पनेचे घोषवाक्य घेवून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेस १२ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला . लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मॅरेथॉनला प्रसिध्द नर्तिका व सिने कलाकार सुधा चंद्रन यांच्या हस्ते व आर जे अर्चना आणि आर जे सलिल यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून प्रारंभ झाला.
श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे प्रमुख संयोजक, स्पोर्टस काँम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक परेश ठाकूर यांच्या सुयोग्य नियोजनातून पार पडलेल्याया मॅरेथॉन ला उदंड प्रतिसाद लाभला व मॅरेथॉन यशस्वीरित्या संपन्न झाली.
स्पर्धेतील पुरूषांच्या खुल्या गटात बीडच्या अविनाश साबळे याने, महिलांच्या गटात वेस्टर्न रेल्वेच्या किरण सरेदार तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुरूषांच्या खुल्या गटात अलिबागच्या सुजित गमरे आणि महिलांच्या गटात उरण जिमखान्याच्या सोनिया मोकल यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावित मॅरेथॉन मध्ये बाजी मारली.