• English
  • मराठी

सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक २०१८ एकांकीका’ स्पेर्धेच्या अंतिम फेरीला पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.

सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक २०१८ एकांकीका‘ स्पेर्धेच्या अंतिम फेरीला पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.अंतिम फेरीच्या स्पर्धेचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, दिगदर्शक व अभिनेते संतोष पवार, ज्येष्ठ रंगकर्मी भरत सावले यांच्या हस्ते झाले. यावेळी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बराटे, मुंबई विद्यापीठाच्या स्टुडन्ट वेलफेरचे संचालक डॉ. सुनिल पाटील, भाजपचे रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे कार्यवाह व नियामक मंडळ सदस्य शामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, गणेश जगताप, प्रीतम म्हात्रे, चिन्मय समेळ, पत्रकार गणेश कोळी आदी उपस्थित होते. नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा २०१४ ला प्रारंभ केला. यंदा या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला तब्बल १ लाख रुपयांचे बक्षिस आणि मानाचा अटल करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल झाल्या आहेत.