• English
  • मराठी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा आपली दिवाळी सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत साजरी केली.यावर्षी देशभर त्यांच्या आवाहनाने नागरिकांनी देशभर प्रतिसाद देत सैनिकांसाठी दिवा लावून दिवाळी साजरी केली. सैनिकांच्या कुटुंबियांबद्धल समाजात आदराची भावना हवी.तसेच त्यांना शक्य ती मदत शासनाने जबाबदारी म्हणून करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले. पनवेलचे सुपुत्र गौरव टाव्हरे हे लेफ्टनंट पदावर रुजू होत असल्याने सुस्मित सोसायटीच्या वतीने त्यांच्यासाठी शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. पनवेलचा पहिलाच तरुण भारतीय सैन्यात अधिकारी पदावर दाखल होतोय त्याबद्धल अभिमान असल्याचे सांगत त्यांनी गौरवला शुभेच्छा दिल्या. पनवेलकरांच्या प्रेमाच्या शिदोरीवर यशाची शिखरे पादाक्रांत करा असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा आपली दिवाळी सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत साजरी केली.यावर्षी देशभर त्यांच्या आवाहनाने नागरिकांनी देशभर प्रतिसाद देत सैनिकांसाठी दिवा लावून दिवाळी साजरी केली. सैनिकांच्या कुटुंबियांबद्धल समाजात आदराची भावना हवी.तसेच त्यांना शक्य ती मदत शासनाने जबाबदारी म्हणून करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले.
पनवेलचे सुपुत्र गौरव टाव्हरे हे लेफ्टनंट पदावर रुजू होत असल्याने सुस्मित सोसायटीच्या वतीने त्यांच्यासाठी शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. पनवेलचा पहिलाच तरुण भारतीय सैन्यात अधिकारी पदावर दाखल होतोय त्याबद्धल अभिमान असल्याचे सांगत त्यांनी गौरवला शुभेच्छा दिल्या. पनवेलकरांच्या प्रेमाच्या शिदोरीवर यशाची शिखरे पादाक्रांत करा असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.