पनवेल महापलिकेच्या माध्यमातून नागरीकांना विविध सुविधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ठाणानाका येथील एचओसी कॉलनी येथे पथदिवे बसविण्यात आले आहे. या पथदिव्यांचे उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.