• English
  • मराठी

ध्येय व लक्ष्य

• युवा क्षेत्र

युवक म्हणजे देशाच्या विकासाच्या साक्षात  प्रतिकृती असतात. देशाची तब्बल  ५० कोटी एवढी युवा लोकसंख्या ही देशाची मालमत्ता आहे. म्हणुनच युवक विकासाला मोठी चालना देण्याची गरज लक्षात  घेऊन युवा पिढीचा विकास, सक्षमीकरण व प्रशिक्षणावर केंद्रिभूत विशेष कर्यक्रम राबवण्याचे मी ठरवले आहे.

• शिक्षण

शास्त्रशुद्ध स्वरूपाचा दर्जात्मक स्तर, व्यवस्थापन कोशल्ये व मानवी मूल्ये यांच्या सहाय्याने अत्यंत अवघड अशा आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सुसज्ज युवकांना घडवणे.

• क्रीडा आणि मनोरंजन
क्रीडाप्रकार किंवा खेळ हे युवकांशी निगडीत आणखी एक महत्वपूर्ण क्षेत्र आहे.म्हनुनच खेळांच्या सुविधांमध्ये सुधरणा घडवून ते समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी सुसाध्य बनवण्यासाठी मी आवश्यक पावले उचलत आहे .

• महिला कल्याण
महिलांचे संघटीकरण , समन्वय आणि शिक्षनाचि गरज , स्वावलंबन व विकास यांच्या गरजेबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण करणे . महिलांमध्ये सामजिक न्याय , आर्थिक सबलीकरण व कायदेशीर अधिकारांबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण करणे . विशेषत: ग्रामीण भागात महिलामधील नेतृत्व व निर्णय क्षमता  आदी गुण ओळखले आणि हे गुण वाढवून त्यांचे सशक्तीकरण करणे . चरितार्थासाठी पर्याय म्हणून त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे . रोजगार निर्मिताचे मार्ग तसेच लघु उद्योग सुरु करण्यासाठी संभाव्य महिला व्यावसायिकांना आवश्यक प्रशिक्षन देणे . महिलांना विशेषत: आरोग्य , स्वच्छता व पोषण या संदर्भातील माहिती देणे व  आवश्यक प्रशिक्षन देणे

• आरोग्य

जनतेच्या वैयक्तित आणि कौटुंबिक आरोग्याच्या समस्यांचा निराकरणासाठी विविध उपाय योजना करण्यासाठी मी कटिबद्ध आहे . विविध आजारांवर मात करण्यासाठी सर्वोत्तम वैधकीय सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन .

प्रशांत ठाकूर,
विधानसभा सदस्य
१८८ पनवेल मतदारसंघ, महाराष्ट्र