Prashant Thakur

Official page of Mr. Prashant Thakur | MLA, Panvel Vidhan Sabha | President, BJP Raigad District | Worked for development of Panvel City with a vision to achieve Panvel of peoples' dreams
Prashant Thakur
Prashant ThakurSunday, February 18th, 2018 at 3:30am
#पनवेल महापालिका हद्दीतील गावांना मुबलक #पाणी मिळण्यासाठीचे पहिले पाऊल #अमृत_योजने च्या माध्यमातून पडणार आहे.
लोकसंख्या व भविष्यकाळाचा वेध घेता पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशिल असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती अमर पाटील, पाणी पुरवठा सभापती निलेश बाविस्कर, नगरसेवक अजय बहिरा, एमजीपीचे कार्यकारी अभियंता अनिल घाडगे, उपअभियंता एस. के. दसोरे, सहाय्यक अभियंता प्रशांत पांढरपट्टे, शाखा अभियंता श्री. पवार, श्री. अलगट आदी उपस्थित होते.
यावेळी या योजनेच्याविषयी सर्वंकष चर्चा झाली. पनवेलच्या पाणी प्रश्नाबाबत संबधित मंत्री, पालकमंत्री यांच्याकडे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
वाढत्या नागरीकरणाचा वेध घेत सक्षम पाणीपुरवठा यंत्रणेसाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेचे बळ देण्यात येत आहे. त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात या योजनेची सक्षमपणे अंबलबजावणी करीत आहेत. पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीचे देहरंग धरण आहे. या धरणाची क्षमता कमी असल्याने महापालिकेला पालिका एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून पाणी विकत घ्यावे लागते. पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना मुबलक पाणी मिळावा, याकरिता आपल्यासोबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महापालिकेला अमृत योजना मिळाली आहे. त्यानुसार पूर्वी ५० कोटी ५० लाख रुपयांच्या योजनेत तब्बल २०४ कोटी रुपयांची भर पडत ही योजना आता २५४ कोटी ५० लाख रुपयांची झाली आहे.
केंद शासन पुरस्कृत असलेल्या अमृत योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे काम होणार असून महापालिका हद्दीतील २९ महसूल गावात एकूण ४० पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. व त्यासोबत गावांमध्ये अंतर्गत एकूण १६५ किलोमीटर नवीन पाईपलाईन जोडणी करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात याकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आश्वासित केले आहे.
#Panvel
Prashant Thakur
Prashant Thakur added 2 new photos.Sunday, February 18th, 2018 at 12:27am
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील त्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार घालून अभिवादन केले . यावेळी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीदिनानिमित्त काढण्यात आलेल्या क्रांतीज्योतीचे स्वागत केले
#BJP
Prashant Thakur
Prashant ThakurSaturday, February 17th, 2018 at 10:49pm
"अब सोच की दिवार उठेगी.. "
भारतातील पहिला लाईव्ह रिऍलिटी शो 'रायझिंग स्टार- सिझन २' मध्ये १७ व १८ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री ९ वाजता महाराष्ट्राचा सुपुत्र व आपल्या सर्वांचा लाडका गायक कुमार #सागर_म्हात्रे याला लाईव्ह एपिसोड सुरु असताना नक्की #वोट करा.
त्यासाठी तुम्हाला एपिसोड चालू असताना #VOOT_APP डाउनलोड करून CHECKING TO VOTE करून हिरवे बटण स्वाईप करून वोट करायचे आहे. तेव्हा आपल्या लाडक्या गायकाला जरूर वोट करा.
#RisingStar #SagarMhatre #KeepVoting Sagar Mhatre
Prashant Thakur
Prashant ThakurSaturday, February 17th, 2018 at 5:00pm
राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक #वासुदेव_बळवंत_फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन झाले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#VasudevBalwantPhadke
Prashant Thakur
Prashant Thakur is at Panvel.Friday, February 16th, 2018 at 11:30pm
भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मच्छीमार सेलच्या पनवेल तालुका संयोजकपदी मोरावे येथील उत्तम कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारी २०१८ रोजी कोळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते निलेश म्हात्रे, नामदेव गाताडे, रविंद्र शेळके आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उत्तम कोळी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. उत्तम कोळी यांना देण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास आम्हाला आहे आणि तो ते पूर्ण करून दाखवतील.

#BJP #BJP4Panvel #Raigad
Prashant Thakur
Prashant Thakur shared their post.Friday, February 16th, 2018 at 7:00pm
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या विमानतळाचे भूमिपूजन करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र राज्यपाल श्री च. विद्यासागर राव, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू, रायगड जिल्हा पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे.
तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
#BJP #NaviMumbai #NarendraModi #DevendraFadnavis Narendra Modi Devendra Fadnavis CMOMaharashtra Devendra Fadnavis for Maharashtra