Chatrapati Shivaji Maharaj
तिक्ष्न बुद्धिमत्ता व बिनतोड दूरदृष्टीचे वरदान लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्यानेच अन्याया विरुद्ध लढा उभारला . त्यांचा प्रेरणादाई व अत्यंत आकर्षक व्यक्ती मत्वामुळे त्याच्या बद्दल जनमानसात आदर व श्रद्धेचे स्थान निर्माण केले . छत्रपती शिवाजी या जनमानसात घर करणाऱ्या मराठा राज्यकर्त्याने अथांथ मुघल साम्राज्याला तकदिविरुध उभे राहण्याचे धेर्य दाखविले . मातेचा धोरणीपणा , पित्याचे अथक प्रयत्न व मातृभूमितील प्रतिष्ठा यामुळे नवतरुण शिवाजीला अत्यंत कुशाग्र लढवैया नेता बनण्याची प्राथमिक प्रेरणा मिळाली .

औरंगजेबाच्या राजवटीच्या काळात सक्तीशाली मुघल साम्राज्याच्या उभे राहण्याचे शौर्य दाखवल्यामुळे छत्रपती शिवराय हे इतरापेक्षा वेगळे ठरले . ते हुशार नेतृत्व गुण व क्रांतिकारी धोरण यांमुळे सर्व किल्ले व राज्य काबीज करण्याचे औरंगजेबचे प्रयत्न सफल होऊ शकले नाही . विजापूरच्या सुलतानी राजवटीचा सेनापती / प्रधान अफजल खानच्या विरोधातील प्रतापगडाची मोहीम हि शिवरायाच्या परकीय राजवटीविरोधात बंडखोरीतील उल्लेखनीय कामगिरी ठरली आणि या मोहिमेतील मराठमोळ्यांच्या मनात त्यांना राज्यकर्त्याचे स्थान प्राप्त झाले बिनचूक नियोजन , त्याच्या अंमलबाजावनीची गती व अतुलनीय नेतृत्व गुण त्याच्या आधारावरच ते या मोहिमेत विजय प्राप्त करू शकले.

मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दबावामुळे संपूर्ण महाराष्ट्र दु:ख , दुर्बलता , वेदना व अपमान त्याच्या सावटाखाली दिवस कंठत होता . आपल्या मातृभूमितील मुस्लिम राज्यकर्त्याचे जुलूम , अत्याचार व दुराचारी त्याची जाणीव गरीब जनतेला शिवरायांनीच प्रथम करून दिली . अन्याय सहन न करता त्याचा मुकाबला करण्याची प्रथम स्फूर्ती त्यांनीच लोकांना दिली म्हणूनच त्याचे नेपोलियन जुलियस सीझर व स्वीडिश सम्राट गुस्तावस अडोल्फस त्याच्यासारख्या राज्याकार्त्यांबरोबर आदरपूर्वक घेतले जाते . शिव छत्रपती हे सर्व जाती धर्म आणि भाषिकांना समान स्वीकृती व वागणूक देऊन सर्वासाठी सारखीच सहानभूती असणारे नि : पक्षपाति राजे ठरले