• English
  • मराठी

राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय व जनकल्याणाच्या योजना राबवत वर्षभरात उत्कृष्ठ काम केले . राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला . मेळाव्यात प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले .