• English
  • मराठी

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील निलिकॉन फूड डाईज अँड केमिकल लिमिटेड युनिट २, क्लॅरीयंट केमिकल आणि सुदर्शन इंडस्ट्रीज केमिकल लिमिटेड कंपनी येथील कंत्राटी कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. त्याअंतर्गत या कंपनीच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील निलिकॉन फूड डाईज अँड केमिकल लिमिटेड युनिट २, क्लॅरीयंट केमिकल आणि सुदर्शन इंडस्ट्रीज केमिकल लिमिटेड कंपनी येथील कंत्राटी कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. त्याअंतर्गत या कंपनीच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. धाटाव औद्योगिक क्षेत्रात कंत्राटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी जय भारतीय कामगार संघटनेने पुढाकार घेतल्याने धाटाव औद्योगिक क्षेेत्रातील निलिकॉन फुड डाईज अ‍ॅन्ड केमिकल्स युनिट नं.२, क्लॅरीअन्ट केमिकल्स लि. व सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज या तीन कंपनीत संघटना स्थापन केले असून त्यांच्या गेट समोर नामफलक अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.