• English
  • मराठी

आयओटी एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाने कामगारांना त्यांचे न्यायिक हक्क न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आपण दिला आहे. उरण तालुक्यातील धुतूमस्थित असलेल्या आयओटीई कंपनीत गेल्या १५ महिन्यापासून नवीन करारनामा झाला नाही, त्यामुळे या कामगारांनी जून २०१७ मध्ये जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील जय भारतीय कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. या कंपनीत असलेले कामगार नव्या करारापासून वंचित आहेत, त्यामुळे या कामगारांनी १९ एप्रिलपासून काम बंद आंदोलन पुकारला आहे. दरम्यान कामगारनेते जितेंद्र घरत, व्यवस्थापन अधिकारी शिवाजी चौगुले, ठेकेदार विलास ठाकूर यांच्यासोबत आपण या विषयावर चर्चा केली. चर्चेअंती आपण कंपनी व्यवस्थापनाला हा प्रश्न तातडीने निकाली न लागल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

आयओटी एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाने कामगारांना त्यांचे न्यायिक हक्क न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आपण दिला आहे.
उरण तालुक्यातील धुतूमस्थित असलेल्या आयओटीई कंपनीत गेल्या १५ महिन्यापासून नवीन करारनामा झाला नाही, त्यामुळे या कामगारांनी जून २०१७ मध्ये जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील जय भारतीय कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. या कंपनीत असलेले कामगार नव्या करारापासून वंचित आहेत, त्यामुळे या कामगारांनी १९ एप्रिलपासून काम बंद आंदोलन पुकारला आहे. दरम्यान कामगारनेते जितेंद्र घरत, व्यवस्थापन अधिकारी शिवाजी चौगुले, ठेकेदार विलास ठाकूर यांच्यासोबत आपण या विषयावर चर्चा केली. चर्चेअंती आपण कंपनी व्यवस्थापनाला हा प्रश्न तातडीने निकाली न लागल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.