• English
  • मराठी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतॄत्वाखाली सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनावर धडक मोर्चा

कामोठे शहरात दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या पाहता होणारा पाणी पुरवठा हा अपुरा आहे. सिडकोकडून कामोठे परिसरातील पाणी पुरवठयासंदर्भात योग्य नियोजन झाले नसल्याने येथील नागरिकांची पाण्याविना गैरसोय होत आहे .कामोठे शहराला सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करण्याऱ्या सिडकोच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी कामोठयावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतॄत्वाखाली सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनावर मोर्चाने धडक देण्यात आली. सातत्याने मागणी करूनही नियोजनबध्द पाणी पुरवठा होत नसल्याने यावेळी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करीत सिडकोच्या अनागोंदी कारभाराचा निदर्शने करून निषेध व्यक्त केला. या मोर्चात भाजप कार्यकत्र्यांसह सोसायटीमधील रहिवाशांची उपस्थिती लक्षणीय होती.