तळोजा फेज १ मध्ये सुरळीत आणि जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली जातील तसेच लवकरच पाण्याची टाकी बांधण्यात येईल व एम.आय.डी.सी मध्ये पाईप लाइनला पंप बसवून जास्त दाबाने पाणी दिले जाईल असे आश्वासन दिले. तळोजा फेज १ मधील पाणी समस्येबाबत भारतीय जनता पार्टीचे तळोजा फेज १ अध्यक्ष निर्दोष केणी व विभागातील सोसायटी अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी घेतलेल्या भेटीच्या वेळी सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी व एम.आय.डी.सी अधिकारी यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन पाणी समस्येबाबत चर्चा केली.