• English
  • मराठी

एकीकडे सुशिक्षित बेकारांची वाढणारी संख्या तर दुसरीकडे विविध क्षेत्रांसाठी कौशल्यप्रधान मनुष्यबळाचा तुटवडा अशा स्थितीवर मात करण्यासाठी ‘राष्ट्रीय कौशल्य विकास’ उपक्रमाच्या माध्यमातून नियोजन आयोगाने मनुष्यबळास प्रशिक्षित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. या अभियानानुसार सरकार असंघटित क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण देईल. युवकांमध्ये रोजगारासंदर्भात योग्य ते कौशल्य निर्माण होण्यासाठीही सरकार प्रयत्न करणार आहे. याचाच एकभाग असलेल्या कामोठ्यातील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतंर्गत केंद्राचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.