• English
  • मराठी

स्थानिक कामगारांना कामावरून काढून टाकणार्‍या खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉलमधील कार्निवल सिनेमा व्यवस्थापनाच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज थिएटर बंद आंदोलन करण्यात आले.जोपर्यंत कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाईल, आठवडाभरात कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे,अन्यथा या आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडू,आज केवळ खारघरपुरतेच मर्यादित कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत.जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यवस्थापनाला दिला आहे. सायंकाळी 4 वाजता हे आंदोलन करण्यात आले.