• English
  • मराठी

२०२२ साली देशातील ७० टक्के लोकसंख्या युवकांची असणार हे ओळखून मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडिया या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केल्या आहेत. कौशल्यविकास प्रशिक्षण तसेच सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार या मार्गाने देश विश्वगुरू बनणार आहे. पनवेल शहरातील कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल येथील क्रीडांगणावर ”भव्य मल्हार रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते . हजारो युवकांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर,जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,उदघाटक व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र युवामोर्चा अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर व अन्य मान्यवर तसेच हजारो युवक उपस्थित होते. दिवसभर शिस्तबद्ध वातावरणात व तरुणांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात हा रोजगार मेळावा पार पडला.

२०२२ साली देशातील ७० टक्के लोकसंख्या युवकांची असणार हे ओळखून मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडिया या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केल्या आहेत. कौशल्यविकास प्रशिक्षण तसेच सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार या मार्गाने देश विश्वगुरू बनणार आहे.
पनवेल शहरातील कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल येथील क्रीडांगणावर ”भव्य मल्हार रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते . हजारो युवकांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर,जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,उदघाटक व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र युवामोर्चा अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर व अन्य मान्यवर तसेच हजारो युवक उपस्थित होते. दिवसभर शिस्तबद्ध वातावरणात व तरुणांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात हा रोजगार मेळावा पार पडला.