• English
  • मराठी

जनहिताची कामे करणार्‍या भाजपच्या वतीने सुकापूर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. सुकापूर रिक्षा स्टँड ते विठ्ठल रुक्मिणी मंदीरा पर्यंतच्या रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण तसेच श्रद्धा संकुल अपार्टमेंट मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामांचा शुभारंभ करण्यात आला. या विकासकामांमुळे सुकापूरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुकापूर रिक्षास्टँड ते विठ्ठल रुक्मिनी मंदीरा पर्यतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुकापूर ग्रामपंचायत निधीतून करण्यात येणार असून, त्या साठी ४१ लाख निधी मंजूर झाला आहे. तर श्रद्धा संकुल अपार्टमेंटमध्ये १४व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

जनहिताची कामे करणार्‍या भाजपच्या वतीने सुकापूर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
सुकापूर रिक्षा स्टँड ते विठ्ठल रुक्मिणी मंदीरा पर्यंतच्या रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण तसेच श्रद्धा संकुल अपार्टमेंट मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामांचा शुभारंभ करण्यात आला. या विकासकामांमुळे सुकापूरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुकापूर रिक्षास्टँड ते विठ्ठल रुक्मिनी मंदीरा पर्यतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुकापूर ग्रामपंचायत निधीतून करण्यात येणार असून, त्या साठी ४१ लाख निधी मंजूर झाला आहे. तर श्रद्धा संकुल अपार्टमेंटमध्ये १४व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.