नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या दहागाव समन्वय समितीची बैठक मुंबईतील निर्मल भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विमातळ प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, समन्वय समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.