• English
  • मराठी

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक २०१८’ एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक २०१८’ एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक पद्मश्री रमेश सिप्पी यांचा सन्मान केला गेला. या स्पर्धेत ‘मादी’ या एकांकिकेने प्रथम, ‘चौकट’ द्वितीय, तर ‘तुरटी’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. या वेळी महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर, किरण जुनेजा सिप्पी, नाट्य कलावंत कीर्ती शिलेदार, अभिनेत्री हेमांगी खोपकर-राव, निर्मात्या कल्पना कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे, मुंबई विद्यापीठाच्या स्टुडन्ट वेलफेरचे संचालक डॉ. सुनिल पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे कार्यवाह व नियामक मंडळ सदस्य शामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, गणेश जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती.