• English
  • मराठी

जागतिक कीर्तीचे शहर व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे असा प्रस्ताव १९ ९६ साली भाजप सेना युतीसरकाराने केला होता. नंतरच्या सत्ताधारी सरकारने या प्रस्तावावर कांहीच काम केले नाही. २०१४ मध्ये ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देवू भाजपला साथ असे म्हणत भाजप सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने सर्व परवानग्या मिळवून शिवस्मारक उभे राहत आहे.या शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून स्वप्नपूर्तीचा क्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन आ. प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केले.हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘रायगडचा रथ’ ढोल ताशांच्या गजरात भव्य बाईक रॅली काढून पनवेल मधून मुंबईकडे रवाना करताना ते बोलत होते.राज्यातील पवित्र गडकिल्यांची माती व नद्यांचे पाणी यांच्यामुळे महाराष्ट्राची नाळ शिवस्मारकाशी जुळली जाणार आहे असेही ते म्हणाले. राज्यभरामध्ये शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या पवित्र नद्यांचे पाणी व इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्यांची माती या स्मारकासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संकलित केली आहे. रायगड किल्यापासून निघालेल्या रथ पाचाड-महाड-माणगाव-रोहा-वडखळ-पेण-पळस्पे या मार्गे जिल्ह्यातील किल्यांची माती व नद्यांचे पाणी संकलित करत पनवेल येथील शिवाजी चौक येथे आला. पनवेलमध्ये या रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जागतिक कीर्तीचे शहर व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे असा प्रस्ताव १९ ९६ साली भाजप सेना युतीसरकाराने केला होता. नंतरच्या सत्ताधारी सरकारने या प्रस्तावावर कांहीच काम केले नाही. २०१४ मध्ये ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देवू भाजपला साथ असे म्हणत भाजप सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने सर्व परवानग्या मिळवून शिवस्मारक उभे राहत आहे.या शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून स्वप्नपूर्तीचा क्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन आ. प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केले.हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘रायगडचा रथ’ ढोल ताशांच्या गजरात भव्य बाईक रॅली काढून पनवेल मधून मुंबईकडे रवाना करताना ते बोलत होते.राज्यातील पवित्र गडकिल्यांची माती व नद्यांचे पाणी यांच्यामुळे महाराष्ट्राची नाळ शिवस्मारकाशी जुळली जाणार आहे असेही ते म्हणाले.
राज्यभरामध्ये शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या पवित्र नद्यांचे पाणी व इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्यांची माती या स्मारकासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संकलित केली आहे. रायगड किल्यापासून निघालेल्या रथ पाचाड-महाड-माणगाव-रोहा-वडखळ-पेण-पळस्पे या मार्गे जिल्ह्यातील किल्यांची माती व नद्यांचे पाणी संकलित करत पनवेल येथील शिवाजी चौक येथे आला. पनवेलमध्ये या रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.