• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय होणारे परेश ठाकूर यांची भाजपा आरपीआय युतीच्यावतीने सर्वानुमते गटनेतेपदी आज निवड करण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय होणारे परेश ठाकूर यांची भाजपा आरपीआय युतीच्यावतीने सर्वानुमते गटनेतेपदी आज निवड करण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकापआघाडीला पराभावाची धूळ चरणाऱ्या भाजप आरपीआय युतीच्या नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक मार्केट येथे पार पडली.या बैठकीत नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर,कोकण संघटन मंत्री सतीश धोंड,जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेवर भाजप आरपीआययुतीचा झेंडा फडकाविणाऱ्या शिलेदारांचा सत्कार करण्यात आला तर गटनेतेपदी सर्वानुमते परेश ठाकूर यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपाचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील,जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान सर्व नगरसेवक आणि मान्यवरांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकॄती पुतळ्यास तसेच हुतात्मा स्मारकास अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कराल अशी अपेक्षा व्यक्त करून जास्तीत जास्त विकासकामे करा आणि आपल्या महानगरपालिकेचा सर्वांगिण विकास करा असे आवाहन केले.