• English
  • मराठी

गेली अनेक वर्षे अंधारात असलेल्या फणसवाडी या दुर्गम आदिवासी पाड्याचे विद्युतीकरण करण्यात आले असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज या विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात 14 ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात विद्युत मीटरचे वाटपही करण्यात आले. गावात वीज आल्यामुळे ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे. फणसवाडी या आदिवासी पाड्यात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ देशेकर, गजानन पाटील, सरपंच संगीता शिंदे, सहाय्यक अभियंता जी. एस. सूर्यवंशी, हणमंत खैर, अनिता वारगडा, बुधाजी खैर, जेष्ठ कार्यकर्ते शांताराम चौधरी, शत्रुघ्न उसटकर, कान्हा पारधी, कृष्णा सप्रा, अनंता खैर यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त अभियंता स्वामी विवेक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण दुर्गम आणि आदिवासी भागासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून या वेळी केले.