• English
  • मराठी

#पनवेल महापालिका हद्दीतील गावांना मुबलक #पाणी मिळण्यासाठीचे पहिले पाऊल #अमृत_योजने च्या माध्यमातून पडणार आहे. लोकसंख्या व भविष्यकाळाचा वेध घेता पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशिल असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्यात आली. 

#पनवेल महापालिका हद्दीतील गावांना मुबलक #पाणी मिळण्यासाठीचे पहिले पाऊल #अमृत_योजने च्या माध्यमातून पडणार आहे.
लोकसंख्या व भविष्यकाळाचा वेध घेता पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशिल असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्यात आली. 
यावेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती अमर पाटील, पाणी पुरवठा सभापती निलेश बाविस्कर, नगरसेवक अजय बहिरा, एमजीपीचे कार्यकारी अभियंता अनिल घाडगे, उपअभियंता एस. के. दसोरे, सहाय्यक अभियंता प्रशांत पांढरपट्टे, शाखा अभियंता श्री. पवार, श्री. अलगट आदी उपस्थित होते. 
यावेळी या योजनेच्याविषयी सर्वंकष चर्चा झाली. पनवेलच्या पाणी प्रश्नाबाबत संबधित मंत्री, पालकमंत्री यांच्याकडे आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 
वाढत्या नागरीकरणाचा वेध घेत सक्षम पाणीपुरवठा यंत्रणेसाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेचे बळ देण्यात येत आहे. त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात या योजनेची सक्षमपणे अंबलबजावणी करीत आहेत. पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीचे देहरंग धरण आहे. या धरणाची क्षमता कमी असल्याने महापालिकेला पालिका एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून पाणी विकत घ्यावे लागते. पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना मुबलक पाणी मिळावा, याकरिता आपल्यासोबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महापालिकेला अमृत योजना मिळाली आहे. त्यानुसार पूर्वी ५० कोटी ५० लाख रुपयांच्या योजनेत तब्बल २०४ कोटी रुपयांची भर पडत ही योजना आता २५४ कोटी ५० लाख रुपयांची झाली आहे. 
केंद शासन पुरस्कृत असलेल्या अमृत योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे काम होणार असून महापालिका हद्दीतील २९ महसूल गावात एकूण ४० पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. व त्यासोबत गावांमध्ये अंतर्गत एकूण १६५ किलोमीटर नवीन पाईपलाईन जोडणी करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात याकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आश्वासित केले आहे.