भारतीय जनता पार्टी उलवे नोड 1 व 2 यांच्या वतीने कोपर-गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबीराचे उदघाटन आमदार मंदातार्इ म्हात्रे यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले . शिबिरास आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते . या महाशिबीरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हाडांचे रोग, हृदयविकार दंतरोग, मधुमेह, नाक, कान व घसा, आयुर्वेदिक उपचार अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात आले. त्याचबरोबरीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे तसेच कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटपही करण्यात आले.या महाशिबीराचा तीन हजारहून अधिक शिबीरार्थींनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.