• English
  • मराठी

पनवेल महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण महासभेत पाणीपुरवठा, घनकचरा, झोपडपट्टी आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

पनवेल महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण महासभेत पाणीपुरवठा, घनकचरा, झोपडपट्टी आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका हद्दीतील पाणी पुरवठ्याची कमी केलेली वेळ आणि पाणी कमी दाबाने येत असल्याबद्दल महापालिकेच्या महासभेत अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर शहरवासियांना पुरेशा दाबाने आणि ठरलेल्या पूर्णवेळेत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.