पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास अपेक्षित आहे. त्यांच्या सबका साथ, सबका विकास, या ध्येय धोरणाप्रमाणे पनवेल तालुक्यातील उमरोलीकरांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. पनवेल-माथेरान रस्त्यावर असलेल्या उमरोली गावात जाण्याच्या मार्गावरील पुलाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.