वैश्यवाणी समाज कळंबोली व ग्रामीण विभागातर्फे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
वैश्यवाणी समाज कळंबोली व ग्रामीण विभागातर्फे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोकण म्हाडाचे सभापती श्री. बाळासाहेब पाटील, नगरसेवक श्री. अमर पाटील, वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष श्री. अतुल साखरे, माजी अध्यक्ष श्री. दत्ता तांबोळी, श्री. रविंद्र झिंजे आदि उपस्थित होते. वैश्यवाणी समाजाने प्रामाणिकपणे परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैश्यवाणी समाज केवळ व्यापारात राहिलेला नाही तर तो उद्योग व इतर व्यवसायात देखील उतरलेला आहे. अनेक तरुण तरुणी यांनी आपल्या क्षेत्रात नावलौकिक कमवलेले आहे. पनवेल तालुक्यात व महापालिका हद्दीत वैश्यवाणी समाज हा मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना सिडकोचा प्लॉट मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.