• English
  • मराठी

कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल येथे आयोजित सैन्य भरती मेळाव्यास काल पहाटे अडीच वाजेपासून सुरुवात झाली.

कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल येथे आयोजित सैन्य भरती मेळाव्यास काल पहाटे अडीच वाजेपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मुंबई शहर भागातील तब्बल अडीच हजारांहून अधिक युवकांनी मेळाव्यास उपस्थिती दिली. पहिल्याच दिवशी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना. रविंद्र चव्हाण यांनी भल्या पहाटे चार वा. भरती स्थळी जाऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली.