• English
  • मराठी

खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग कॉलेज मध्ये भाजपाच्या रायगड जिल्हा बुध्दिजीवी सेल तर्फे रायगड जिल्ह्यातील उच्च शिक्षितांचे ‘बुध्दिजीवी संमेलन’ आयोजित करण्यात आले होते.

खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग कॉलेज मध्ये भाजपाच्या रायगड जिल्हा बुध्दिजीवी सेल तर्फे रायगड जिल्ह्यातील उच्च शिक्षितांचे ‘बुध्दिजीवी संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला प्रमुख पाहुणे खासदार किरीट सोमय्या होते. अभिनंदनची बिनशर्त सुटका पाकिस्तानला करायला लावून प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी आत्मविश्वास, बुध्दिमत्ता आणि उत्तम नेतृत्व कसे असते हे जगाला दाखवून दिले असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी खारघर येथे झालेल्या बुध्दिजीवी संमेलनात सांगितले.