• English
  • मराठी

‘द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन’च्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १८वा ‘रायगड जिल्हा स्तरीय युवा महोत्सव’ १८ डिसेंबर २०१८ ते २१ डिसेंबर २०१८ दरम्यान उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे आयोजित करण्यात आला होता.

‘द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन’च्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १८वा ‘रायगड जिल्हा स्तरीय युवा महोत्सव’ १८ डिसेंबर २०१८ ते २१ डिसेंबर २०१८ दरम्यान उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उदघाटन मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उरण शहरात रॅली सुद्धा काढण्यात आली. करंजा येथून क्रीडा ज्योत महोत्सवाच्या ठिकाणी आणली गेली. उरण मधील विविध शाळा, कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पथ संचलन, लेझिम, भारतीय वेषभूषेद्वारे प्रेषकांचे लक्ष वेधुन घेतले. महोत्सव उद्घाटनानंतर लगेचच कबड्डी क्रीडा स्पर्धेला सुरवात करण्यात आली. विज्ञान प्रदर्शन, रक्तदान शिबिराचेही आयोजन यावेळी करण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना या महोत्सवात पुरस्कार, सन्मानचिन्ह देउन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.